५० कोटींचे बारामतीचे बसस्थानक; २२ प्लॅटफॉर्म; लवकरच बारामतीकरांच्या सेवेसाठी खुले होणार

1 min read

बारामती दि.१७- एखाद्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला देखील लाजवेल अशा प्रकारचे बसस्थानक बारामती शहरात उभारण्यात आले आहे. पन्नास कोटीहून अधिक खर्च बसस्थानकास आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेले अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त हे बसस्थानक राज्यासाठी आदर्श रोड मॉडेल ठरणार आहे. लवकरच बारामतीकरांच्या सेवेसाठी खुले होणार आहे.

राज्यातील बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या घर्तीवर बारामती शहरातील बस स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. राज्यात नव्हे तर देशातही अशा प्रकारचे बस स्थानक पहावयास मिळणार नाही, अशी रचना या बसस्थानकाची करण्यात आली आहे.

दुमजली बसस्थानकात प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. बारामती शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच बारामती बसस्थानकाची निर्मिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.पुढील २५ ते ५० वर्षाचा विचार करून बारामती शहराचा विकास केला जातो.

बारामतीच्या सर्वांगीण विकासाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच तत्पर असतात. त्याचाच एक भाग म्हणून बारामती शहरात ५० कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक बस स्थानकाची निर्मिती करण्यात आली आहे. स्वप्नवत व सर्व सुविधा नियुक्त असे बस स्थानक लवकरच बारामतीकरांसाठी खुले होईल.

डिझाईन फायनल होताना अशक्य वाटणारी गोष्ट दादांनी शक्य करून दाखवली त्यावरून त्यांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो.

असे बारामतीकर सांगतात. बारामती बसस्थानक तब्बल २२ प्लॅटफॉर्म तसेच ५६ बसेस करता पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. अधिकारी वाहक चालक यांच्या विश्रामगृहाची व्यवस्था तसेच सेमिनार हॉलसह तीस व्यापारी व्यावसायिक गाळे बांधण्यात आले आहेत.

लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या हस्ते या वास्तूंचे उद्घाटन होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बारामतीचे अत्याधुनिक बसस्थानक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात लक्षवेधी ठरले आहे. सर्व सुविधा आणि प्रशस्त जागा, तसेच आकर्षकपणा बारामतीकरांचे लक्ष वेधून घेत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे