महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ५ हजार इलेक्ट्रिक बस:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
1 min read
ठाणे दि.१४:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेल्या ५१५० इलेक्ट्रिक बसगाड्यांचे लोकार्पण नुकतेच ठाणे येथील खोपट बस स्थानकात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी आमदार प्रताप सरनाईक आदि मान्यवर उपस्थित होते.खाजगी बस सेवेशी स्पर्धा करताना प्रवासी हाच आपला परमेश्वर मानून ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदवाक्यानुसार उत्तम दर्जाची सेवा द्यावी. एसटीच्या ताफ्यात संपूर्णपणे वातानुकूलित ई-बसेस दाखल झाल्यामुळे प्रवाशांना आरामदायक आणि पर्यावरणपूरक प्रवास करता येईल.असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रसंगी म्हणाले.
एसटी महामंडळाने ५१५० वातानुकूलित ई-बसेस घेण्याचा धाडसी निर्णय घेतला असून त्यासाठी राज्यभरात १७३ पेक्षा जास्त बसस्थानकांवर ई-बस चार्जिंग स्टेशन्सची निर्मिती करण्यात येत आहे. या ३४ आसनी, वातानुकूलित ई-बसेस बोरिवली-ठाणे-नाशिक या मार्गावर धावणार आहेत. असे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.