राज्य सरकारचा २ लाख ७६ हजार ३०० कोटींचा सात कंपन्यांसमवेत सामंजस्य करार; ६४ हजार रोजगार निर्मिती होणार:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
1 min readमुंबई दि.२९:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सोमवार दि.२९ रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे, हरित हायड्रोजन निर्मितीसाठी सात कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले.
याद्वारे राज्यात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक होणार असून ६४ हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
हरित हायड्रोजन धोरण करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असून हरित हायड्रोजन क्षेत्रात महाराष्ट्र पथदर्शी राज्य बनावे, यासाठी आज झालेले सामंजस्य करार यशस्वीरित्या कार्यान्वित होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.