आळेफाटा येथे अजित पवार मुर्दाबाद च्या घोषणा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे
1 min readआळेफाटा दि.२५:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावरती गुरुवार दि.२५ रोजी आले होते. आळेफाटा येथे चिल्हेवाडी बंदिस्त नलिकेद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा दुपारी दुसऱ्या टप्प्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.
दरम्यान भूमिपूजन उरकून आळेफाटा येथील एका उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी अजित पवार यांचा ताफा जात असताना यावेळी आळेफाटा चौकात अजित पवारांना मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मराठा आंदोलक अजित पवार यांना दाखवण्याची शक्यता यापूर्वीच वर्तवण्यात आली होती.
त्यामुळे, सभेच्या पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात होता. मात्र आळेफाटा चौकात अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, मराठ्यांना आरक्षण मिळाले, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचा, अजित पवार मुर्दाबाद, अजित पवारांचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी पोलिसांनी उद्धव ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष माउली खंडागळे, शरद पवार गटाचे सुरज वाजगे यांसह इतर सुधीर घोलप, अनिल गावडे, योगेश वाडेकर यांना ताब्यात घेतले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे २६ तारखेला मराठा समाजासोबत मुंबईत पोहोचणार आहे.
मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठा समाज असणार आहे. आम्हाला फक्त आरक्षण मिळालं पाहिजे ते कुठंही दिलं तरी चालेल. मग लोणावळ्यात, नवी मुंबईत किंवा आझाद मैदानात दिलं तरी चालेल, असे मनोज जरांगे यांचे म्हणणे आहे.