शिवजयंती उत्सव’ नियोजन बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात संपन्न:- आमदार अतुल बेनके

1 min read

मुंबई दि.२३:- दरवर्षी प्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी किल्ले शिवनेरी येथे होणारा ‘ शिवजयंती उत्सव २०२४ ‘ यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या संदर्भातील नियोजन बैठक मंगळवार दि.२३ रोजी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई मंत्रालय येथे पार पडली असल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.

भव्य शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यासाठी पर्यटन विकास आराखडा अंतर्गत अनेक विकासकामे मंजूर करण्यात येणार आहेत. या पर्यटन विकास आराखड्याच्या माध्यमातून तालुक्यातील पर्यटन धोरणाला एक दिशा आणि चालना मिळणार आहे.

यामुळे जुन्नर तालुक्यातील एकंदरीत सर्वांगीण विकासाला पर्यटनाच्या माध्यमातून मोठी ताकद मिळणार आहे. शिवजन्मभूमीच्या पर्यटन धोरणाच्या दृष्टीने यंदाची शिवजयंती हि ऐतिहासिक ठरेल असा विश्वास आमदार बेनके यांनी या बैठकीच्या निमित्ताने व्यक्त केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे