२२ जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर

1 min read

मुंबई दि .१९- अयोध्येत येत्या २२ जानेवारीला रामलल्लाचा अभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र सरकारने 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसांची सुट्टी काल जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आज महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 22 जानेवारी (सोमवार) सुट्टी जाहीर केली आहे. सध्या देशभरात प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा
सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. निमंत्रितांनाच अयोध्येतील सोहळ्यात उपस्थित राहता येणार असले तरी देशभरातील मंदिरांमध्ये हा सोहळा साजरा
केला जाणार आहे. श्री राम भक्तांकडून सर्व हिंदू देव देवतांच्या मंदिरामध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक मंदिरं सजवली आहेत.अयोध्येत 22 जानेवारी 2024 अयोध्येत श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीराममललांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारद्वारे 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.दरम्यान, याच पार्श्वभूमीवर काही राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गोवा, हरियाणा आणि छत्तीगड या राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे