तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरप्रकार:- सुप्रिया सुळे
1 min readमुंबई दि.९:- महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरप्रकार झाल्याचे दिसून येत असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.यावर बोलताना त्या म्हणाल्या की, परीक्षा २०० मार्कांची असूनही अनेक उमेदवारांना २०० पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. हा सावळा गोंधळ अक्षम्य आहे. एकतर या परीक्षांसाठी अव्वाच्या सव्वा परीक्षा शुल्क आकारले जाते. हे शुल्क भरण्यासाठी अनेक उमेदवारांना अक्षरशः कुठेतरी काम करुन किंवा उसने पैसे घ्यावे लागतात. एवढ्या हाल अपेष्टा सहन केल्यानंतर देखील तर संपूर्ण परीक्षा सदोष पद्धतीने होत असेल तर हे अतिशय संतापजनक आहे.बेरोजगार तरुणांची ही घोर फसवणूक आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.