पारनेर, श्रीगोंदा, नगर तालुक्यातील रस्त्यांना कोट्यवधींचा निधी मंजूर:- खासदार डॉ.सुजय विखे
1 min read
नगर दि.१५:- केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत नगर २३, पारनेर १७ व श्रीगोंदे तालुक्यासाठी ६० कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
खासदार विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत पारनेर, श्रीगोंदे आणि नगर तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हे यश माझ्यासह आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आहे. या सर्वांसमवेत केलेल्या पाठपुराव्यामुळे सदरील भरीव निधी मंजूर झाला असल्याचे मत सुजय विखेंनी मांडले.