पत्रकार वागळेंवरील हल्ल्याचा पारनेर तालुक्यातील पत्रकारांनी केला निषेध

1 min read

पारनेर दि.१५: -पुणे येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना जेष्ठ पत्रकार निखिल वागळे,अॅड्.असीम सरोदे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्यावर काही समाज कंठकांनी भ्याड हल्ला करत त्यांची गाडी फोडली.

अशा समाजकंटकांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कडक कारवाई व्हावी व त्यांना शिक्षा करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने पारनेर तहसिल कचेरी व पारनेर पोलीस स्टेशनला सर्व पत्रकारांचे वतीने निवेदन देण्यात आले. पोलीस स्टेशनला, पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी तर, तहसिल कचेरीवर, नायब तहसिलदार गणेश आढारी, नायब तहसिलदार सुभाष कदम यांनी निवेदनाचा स्विकार केला.

लोकशाठी व संविधान बचावासाठी, लढणार्‍या एका जेष्ठ पत्रकारावर हल्ला म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला झालेला आहे. पत्रकार संरक्षण कायद्यानुसार या हल्लेखोरांवर कडक कारवाई अशी मागणी करत राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने सर्व पत्रकारांनी या घटनेचा जाहीर निषेध केला.

यावेळी बोलताना जेष्ठ पत्रकार दत्ता गाडगे म्हणाले, लोकशाही व संविधान बचावासाठी, हुकुमशाही विरोधात लढणारे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, अॅड असीम सरोदे सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा तपास करून कडक कारवाई करावी आणि या तिघांना पण शासकीय सुरक्षा द्यावी.

निखिल वागळेंवरील हल्ला म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील हल्ला आहे. पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत सदर हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करुन कडक कारवाई करावी अशी मागणी सर्व पत्रकारांचे वतीने दत्ता गाडगे यांनी केली.यावेळी पत्रकारांचे निवेदन स्विकारुन पुढील कार्यवाहीसाठी निवेदन एस पी आॅफीसला पाठवत आहे.पुढील कारवाई वरीष्ठ करतील असे आश्वासन पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिले.

तसेत नायब तहसिलदार गणेश आढारी यांनी सुध्दा आपले निवेदन पुढील कार्यवाहीसाठी पाठवत आहोत.योग्य ती कारवाई होईल असे सांगीतले. याप्रसंगी राज्य मराठी पत्रकार संघाचे जेष्ठ पत्रकार दत्ता गाडगे, सुरेश पाटील खोसे,मुकुंद निघोजकर, संतोष कोरडे, वसंत रांधवन, संपत वैरागर, प्रविण करपे, महेश शिंगोटे आदी पत्रकार उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे