निमगावच्या खंडोबा येथे लिफ्टसह इतर सुविधांसाठी शासकीय जमीन उपलब्ध करुन देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
1 min read
खेड दि.१४:- पुणे जिल्ह्यातील निमगाव (ता.खेड) येथे खंडोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वृद्ध, दिव्यांग, मुले, महिला आदी भाविकांसाठी लिफ्टची सोय करावी. लिफ्टसह इतर सुविधांसाठी तातडीने जिल्हा परिषदेला विनामोबदला शासकीय जमीन उपलब्ध करुन देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दि.१४ रोजी दिले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात खंडोबा मंदिर येथे लिफ्ट बसविणे आणि इतर सोयीसुविधांबाबत बैठक झाली. बैठकीला आमदार दिलीप मोहिते-पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वन वभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी.
वित्त विभागाच्या सचिव शैला ए., पुण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते. तसेच पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे आदी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.