ज्ञानेश्वर राठोड यांना आदर्श कृषी सहाय्यक पुरस्काराने सन्मानित
1 min read
आळेफाटा दि.१४:- ग्रामोन्नती कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव (ता. जुन्नर) यांच्या तर्फे महाराष्ट्र शासन कृषी विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या कृषी सहाय्यकाला दिला जाणारा आदर्श कृषी सहाय्यक हा पुरस्कार उदापूर येथील कृषी सहाय्यक ज्ञानेश्वर राठोड यांना नुकताच प्रदान करून सन्मानीत करण्यात आले आहे.ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायण विभागातून कृषी क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या विविध पदाधिकारी यांना दरवर्षी असे पुरस्कार देऊन सन्मानीत केले जात आहे . या ही वर्षी कृषी विभागा मध्ये दैदीत्यमान कामगिरी करणाऱ्या कृषी विभागातील विविध पदाधिकारी यांना जुन्नर तालुक्यातील परिसरातून निवड करून नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्र येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
अशी माहिती राठोड यांनी दिली.जुन्नरचे आमदार अतुल बेनके, कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ,प्रशस्तीप्रत्रक व सन्मानचिन्ह देऊन आदर्श कृषी सहाय्यक हा पुरस्कार देण्यात आला आल्या बद्दल जुन्नर तालुक्यातून त्याच बरोबर सोशल मीडियाच्या सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.