पोखरी गावात एकही एसटी बस जात नाही; एसटी अभावी विद्यार्थी, महिला,जेष्ठ नागरिकांची गैरसोय

1 min read

पोखरी दि.१६ :- नारायणगाव डेपोची एसटी बस कोरोना पासून बंद असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी २० किलोमिटर पायपीट व सायकल वारी सुरू आहे. आणे पठार भागातील पोखरी (ता.पारनेर)

गावातील विद्यार्थ्यांना हक्काचे शिक्षण घेण्यासाठी शेजारील आणे व इतर ठिकाणी शाळेत जाण्यासाठी दररोज २० किलोमीटरची पायपीट व सायकल चा प्रवास करावा लागत आहे.

महिला व ज्येष्ठ नागरिकांनाही एसटी बस सुरू नसल्यामुळे शासनाच्या सवलतीचा फायदा घेता येत नाही तसेच बस नसल्याने गावात नातेवाईक, पाहुणे मंडळी येण्याचे प्रमाण सुद्धा प्रमाण कमी झाले आहे. गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून माध्यमिक शिक्षणासाठी शेकडो विद्यार्थी दररोज आने व इतर ठिकाणी जात आहेत.

नारायणगाव व पारनेर आगाराची तसेच परिवहन महामंडळाची एकही बस सध्या या गावात जात नाही. ऊन वारा पाऊस या सर्व संकटांचा सामना करत दररोज २० किलोमीटरची पायपीट किंवा मिळेल त्या गाडीला हात करून जावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर मोठ्या प्रमाणात फरक पडत आहेत.

त्यामुळे बऱ्याचशा पालकांनी आपल्या पाल्यांना शहरातील नातेवाईक किंवा बोर्डिंग मध्ये पाठविले आहे. शासनाने लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या जाण्या येण्यासाठी एसटीची सोय उपलब्ध करावी. अशी मागणी सरपंच हिरा जालिंदर पवार, ग्रामपंचायत सदस्य अशोक खैरे, अण्णासाहेब खैरे, उपसरपंच बाळासाहेब शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सतीश पवार पाटील आणि ग्रामस्थ पोखरी यांनी केली आहे.

नारायणगाव बस डेपोला याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार केला असून बस सुरू करण्यात बाबत अद्याप कोणतेही कार्यवाही झाली नाही.”

“हिरा पवार, सरपंच पोखरी

कोरोना कालावधीमध्ये पोखरी गावात बस जात होती.तेव्हा आमच्या डेपोमध्ये १०० बस होत्या.बसची संख्या सध्या कमी होऊन फक्त ५४ झाली आहे. गाड्यांची कमतरता असल्यामुळे पोखरी गावात बस सोडली जात नाही. गाड्या वाढल्या तर गावात बसलो सोडली जाईल.”

वसंत आरगडे, आगार व्यवस्थापक, नारायणगाव

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे