पुणे – नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गात बदल:- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

1 min read

मुंबई दि.१३:- पुणे व नाशिक ही राज्यातील दोन महत्वाची शहरे आहेत. यामुळे ही दोन्ही शहरे रेल्वे जोडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. हा मार्ग तयार करण्याची जबाबदारी महारेलकडे देण्यात आली. या मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामार्गासाठी नुकतेच 2500 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. परंतु या मार्गात अजून एक महत्वाचा बदल झाला आहे. नाशिक पुणे रेल्वे मार्ग 235 किलोमीटरचा आहे. त्याचा मार्गच बदलला आहे. आता हा मार्ग 33 किलोमीटरने वाढणार आहे. त्याला शिर्डी जोडले जाईल, असा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. या मार्गावर 12 ते 16 कोचची रेल्वे धावणार आहे. ही रेल्वे सेमी हायस्पीड असणार आहे.का केला बदल फडणवीस यांनी सांगितले नाशिक-पुणे रेल्‍वेमार्गाबाबत रेल्‍वमंत्र्यांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. सध्या हा मार्ग 235 किलोमीटरचा आहे. विद्यामान मार्गावर एकूण 20 स्टेशन आहे. 18 बोगदे आणि 19 उड्डाणपुल आहे. परंतु या मार्गावरील बोगद्यांमुळे प्रकल्‍पाचा खर्चात मोठी वाढ होणार आहे. यामुळे नाशिक-शिर्डी-पुणे अशा पर्याय तयार केला जात आहे. आता रेल्‍वेमार्गाबाबत रेल्‍वे मंत्रालयाकडून विचार सुरू असल्‍याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हा मार्ग बदलाणार असल्यामुळे त्याचे अंतर 33 किलोमीटरने वाढणार आहे. मार्ग वाढणार, पण असा फायदा होणार नाशिक-शिर्डी-पुणे असा हा रेल्वे मार्ग होणार आहे. या मार्गाचा फायदा नाशिक, पुणे शहरासोबत शिर्डी शहरादेखील होणार आहे. यामुळे या नवीन मार्गाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर लवकरच मंजुरीसाठी सादर केला होईल. हा मार्ग पूर्ण झाल्यावर नाशिक-पुणे अंतर दोन तासांत गाठणे शक्य होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे