वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

1 min read

मुंबई दि.१३:- उकाड्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना गारपीटीने तडाखा दिला आहे. त्यामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झाला आहे. हवामान खात्याने आजही राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. आज आणि उद्या राज्यातील विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो असा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भात पुढील 2-3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता असून मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही पाऊस होईल असं हवामान खात्याने सांगितलं आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील होऊ शकते, असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे