आणे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हळदी कुंकू; ४०० महिलांचा सहभाग
1 min read
आणे दि.१२:- ग्रामपंचायत आणे (ता.जुन्नर) च्या वतीने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या हळदीकुंकू समारंभासाठी श्री रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळाच्या उपाध्यक्ष
भारती बोरा तसेच मंगरूळ गावच्या सरपंच तारा लामखडे, पेमदरा गावच्या सरपंच जयश्री गाडेकर, पारगाव गावच्या सरपंच रेश्मा बोटकर, सामाजिक कार्यकर्त्या कविता पवार या उपस्थित होत्या.
त्याचबरोबर गावातील जवळपास 400 हून अधिक महिला या हळदीकुंकू समारंभाप्रसंगी उपस्थित होत्या. हळदीकुंकू समारंभ निमित्ताने ग्रामपंचायत ने खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे देखील आयोजन केले होते. खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे निवेदन शुभांगी बोरचटे यांनी अतिशय उत्तम प्रकारे केले. या कार्यक्रमात देखील खूप मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेतला.
खेळ पैठणीचा या कार्यक्रमात प्रथम तीन येणाऱ्या महिलांसाठी ओंकार ज्वेलर्स व अदिती क्रिएशन साडी सेंटर चे सर्वेसर्वा कैलास डहाळे यांनी पैठणी व महालक्ष्मीची फ्रेम बक्षीस म्हणून दिली. त्याचबरोबर चौथ्या क्रमांकाचे बक्षीस प्रेरणा ज्वेलर्सचे सर्वेसर्वा संदेश बाबेल यांनी दिले.
चार महिला मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या. हळदीकुंकू समारंभ अतिशय आनंददायी वातावरणात संपन्न झाला. अशी माहिती आणे गावच्या लोकनियुक्त सरपंच प्रियंका प्रशांत दाते तसेच सर्व महिला ग्रामपंचायत सदस्य यांनी दिली.