कल्याण- नगर महामार्गाला पुन्हा एकदा झाडाझुडपांचा विळखा
1 min readआळेफाटा दि.९:- उत्तर पुणे जिल्ह्याच्या टोकावरील अत्यंत महत्वपूर्ण कल्याण- अहमदनगर या महामार्गावर वळण रस्त्याचे ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे रस्त्यावर आल्याने मोठ्या अपघाताची संभावना निर्माण झाली आहे.महामार्गालगत खामुंडी गावच्या हद्दीतील कोकाटे वस्ती नामे शिवारा जवळ वळणावर झाडे व झुडपे मुख्य महामार्गावर आली आहेत. आळेफाट्याच्या दिशेकडून आलेल्या वाहन चालकास ओतूर बाजूकडून आलेले वाहन दिसत नसल्याने गंभिर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच यापूर्वी याच ठिकाणी किरकोळ अपघात देखील घडून गेल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. तरी संबधीत रस्ते बांधकाम विभागाने तात्काळ या धोकादायक झाडांची दखल घेऊन होणारे अपघात टाळावेत अशी खामुंडी ग्रामस्थानी मागणी केली आहे.नगर- कल्याण महामार्गावर अलीकडच्या काळात वाहनांची मोठी वर्दळ वाढली आहे,रस्त्यावर देखील काही ठिकाणी खड्डे पडले असले तरी देखील वहाने सुसाट धावत असतात. प्रवासा दरम्यान अशी रस्त्यावर आलेली झाडे वाहन चालकांना घातक ठरत असल्याने त्या झाडांचा बंदोबस्त करणे क्रमप्राप्त होऊन बसले आहे.