वडगाव कांदळीत ‘विकास गंगा’ ; गावाला १ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी प्राप्त

1 min read

वडगाव कांदळी दि.९:- जुन्नर तालुक्याचे युवा आमदार अतुल बेनके यांच्या निधीतून, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद पुणे पांडुरंग पवार यांच्या विशेष प्रयत्नातून वडगाव कांदळी (ता.जुन्नर) गावाला १ कोटी ४५ लाख रुपये भरघोस निधी प्राप्त झाला आहे. सरपंच उल्का श्रीकांत पाचपुते, उपसरपंच संजय खेडकर , सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या पाठपुराव्याला यश आले असून या मुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या मध्ये वडगाव (कांदळी) सोलर हायमास्ट दिवे बसविणे- १० लक्ष, वडगाव (कांदळी) भोरवाडी चौक सोलर पथदिवे बसविणे -१० लक्ष, प्रजिमा ८ बोरी बेल्हा रोड ते लांडगेमळा रस्ता डांबरीकरण करणे – १० लक्ष, प्रजिमा ९ शिवरस्ता वडगाव बोरी खुर्द रस्ता करणे- १० लक्ष, मुस्लिम दफनभुमी सुधारणा करणे- १० लक्ष. राजंणमार्ग ते शांताराम पवार वस्ती रस्ता करणे- १० लक्ष, राजंणमार्ग ते संतोष बापु भोर वस्ती रस्ता करणे- १० लक्ष, वडगाव (कांदळी) ते निलख लांडगेमळा रस्ता करणे – १० लक्ष, वडगाव (कांदळी) येथे धोबी घाट करणे- १० लक्ष, प्रजिमा ८ ते खालचा पाचपुते मळा रस्ता करणे- १० लक्ष, रांजणमार्ग ते नंदू मुटके वस्ती रस्ता करणे- १० लक्ष. प्रजिमा ८ ते थोरातमळा रस्ता करणे- १० लक्ष, प्रजिमा ४ ते मोरया नगर रस्ता करणे-१० लक्ष, वडगाव (कांदळी) येथील दफनभूमी परिसर सुधारणा करणे- ५ लक्ष, ग्रामसचिवालय उर्वरीत काम करणे – १० लक्ष असा एकूण १ कोटी ४५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाल्याने सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे