श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट च्या बायोगॅस निर्मिती प्रकल्प व संगीत विद्यालय सांस्कृतिक हॉल चा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न
1 min read
ओझर दि.८:- श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र ओझर यांच्या बायोगॅस निर्मिती प्रकल्प व संगीत विद्यालय सांस्कृतिक हॉल या प्रकल्पांच्या भव्य उद्घाटन समारंभ प्रसंगी नुकताच संपन्न झाला. हा उद्घाटन समारंभ राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, अहमदनगर चे आमदार संग्राम जगताप यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी आदिती तटकरे यांनी श्री विघ्नहर गणपती चे दर्शन घेतले आणि श्री विघ्नहर चरणी अभिषेक केला. यावेळी ट्रस्ट च्या वतीने या दोघांचा सत्कार करण्यात आला.श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट च्या माध्यमातून भाविकांच्या सेवेसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रकल्प राबविले जातात.
यात आणखी नवीन प्रकल्पांची भर आज पडली. यावेळी बायोगॅस निर्मिती व संगीत विद्यालयाचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम ट्रस्ट ने सुरू केला आहे. या उपक्रमासाठी ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी आणि ओझर ग्रामस्थ मंडळींचे अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त केल्या.
या कार्यक्रम प्रसंगी समवेत देवस्थान चे अध्यक्ष गणेश कवडे, आमदार अतुल बेनके, सत्यशील शेरकर, आशाताई बुचके यांसह श्री क्षेत्र ओझर येथील सर्व संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.