जुन्नर तालुक्यातील १५ रस्ते विकास कामांसाठी ७ कोटी ३५ लक्ष रुपये मंजूर

1 min read

जुन्नर दि.८:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने व आमदार अतुल बेनके यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजना सन २०२३ – २४ अंतर्गत ५०-५४ योजनेच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील १५ रस्ते विकास कामांसाठी ७ कोटी ३५ लक्ष रुपये मंजूर झाला आहे. यामध्ये ओतुर शेटेवाडी रस्ता कॉक्रिटीकरण करणे – ५० लक्ष रुपये, पिंपरी पेंढार ते म्हसवंडी रस्ता कॉक्रिटीकरण करणे – ५० लक्ष रुपये, रामा २२२ डिंगोरे मराडवाडी आळू पुताचीवाडी ते प्रजिमा १५८ रस्ता करणे इजिमा १९ – ३० लक्ष रुपये, प्रजिमा ४ पिंपळवंडी ते पिंपरी पेंढार (वेठेकरपट हद्द रस्ता सुधारणा करणे) रा.मा. २२२
म्हसवंडी जिल्हा हद्द रस्ता करणे. इजिमा ५ – ३० लक्ष रुपये, येणेरे काले दातखिळवाडी रस्ता सुधारणा करणे इजिमा १२ – ३० लक्ष रुपये, इजिमा ५ पिंपरी पेंढार रस्ता सुधारणा करणे – ४० लक्ष रुपये, डिंगोरे मराडवाडी आळु पुताचीवाडी रस्ता सुधारणा करणे इजिमा (58 जोडणारा रस्ता करणे) इजिमा १९ – ४० लक्ष रुपये, रामा. २२२ अहिनवेवाडी पाचघर चिल्हेवाडी रस्ता सुधारणा करणे. इजिमा – ४० लक्ष रुपये, बेल्हा कळस रस्ता सुधारणा करणे इजिमा ७ – ४५ लक्ष रुपये, तळमाचीवाडी कोकाटेवाडी तळेरान खुबी रस्ता सुधारणा करणे इजिमा ९ – ७० लक्ष रुपये, भगतवाडी कुसुर ते प्रजिमा ५ धामणखेल ते खानापूर प्रजिमा १० ते ग्रामा १११ धालेवाडीरस्ता (धामणखेल हद्द ते लादी कारखाना) सुधारणा करणे. इजिमा १६ – ६० लक्ष रुपये, इजिमा १६ बस्ती वडगाव सहाणी, पिंपळगाव तर्फे नारायणगाव आर्वी ते रा.मा. १११ रस्ता सुधारणा करणे इजिमा १७ – ७० लक्ष रुपये, गोळेगाव जुन्नर रस्ता सुधारणा करणे इजिमा ४ – ६० लक्ष रुपये, इंगळून ते भिवाडे खु इजिमा क्र.२ रस्ता सुधारणा करणे – ६० लक्ष रुपये, जुन्नर ते रा.मा. १११ खोरे वस्ती धामणखेल निमदरी ते प्रजिमा १४ पर्यंत रस्ता करणे इजिमा १५ – ६० लक्ष रुपये.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे