बेल्ह्यात दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर आळेफाटा पोलिसांची कारवाई; आळेफाटा येथे जुगार अड्ड्यावर छापा

1 min read

आळेफाटा दि.८:- अवैध देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्यासह जुगार अड्ड्यांवर आळेफाटा पोलिसांनी मंगळवार (दि.६) कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

आळेफाटा आणि बेल्हे येथे छापा टाकून देशी दारू विक्रेता, मटका व जुगार खेळविणार्यांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले.

यात बेल्हे (ता.जुन्नर) येथे हॉटेल मयुर मागील मोकळ्या जागेत संशयित रामचंद ज्ञानेश्वर औटी (वय ५५ रा. बेल्हे) कडून ९१० रुपये किमतीच्या १३ देशी दारूच्या बाटल्या जप्त करीत गुन्हा दाखल करण्यात आला.

या बाबत ची फिर्याद पोलिस हवालदार विकास गोसावी यांनी दिली आहे. तर आळेफाटा चौकापासून हाकेच्या अंतरावर बस स्थानकाच्या मागील बाजूस एका जुगार अड्ड्यांवर छापा टाकून ३ हजार ६५० रुपये किमंतीचा ऐवज जप्त करण्यात आला.

याप्रकरणी संशयित अक्षय प्रल्हाद कुकडे (वय २४ राहणार आळे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे