आळेफाटा येथून पिकअप ची चोरी; गुन्हा दाखल
1 min readआळेफाटा दि.८:- आळेफाटा येथील पुणे- नाशिक हवे वरील कॅनॉल जवळ लावलेली पिकअप एम एच १० ए क्यू ३०६९ मंगळवार दि.६ रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरी करून नेली आहे. याबाबतची फिर्याद गाडी मालक राजेंद्र रामेश जाधव (वय ५५ रा.आळेफाटा ता. जुन्नर) यांनी आळेफाटा पोलिसात अज्ञात आरोपी विरोधात दिली आहे. पिकअपचे बॉडीवर दोन्ही बाजूस एक्सीस एअर गॅसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड असे लिहिलेले असून
तिचा चेसी नंबर 762586 इंजिन नंबर 587230 जुवाकीअं आहे.या बाबत पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहेत.