आळेफाटा पोलिसांनी जबरी चोरीतील आरोपींना २४ तासात मुद्देमालासह केली अटक

1 min read

आळेफाटा दि.१३:- याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक ८ फेब्रुवारी रोजी रात्री ०९.३० वा. आळे ता. जुन्नर जि. पुणे गावचे हद्दीत आळेफाटा एस.टी. स्टॅण्ड येथून पुणे येथे जाणेसाठी राहूल मुलचंद श्रीवास्तव (वय. ३० वर्षे रा. सांगनोरे मोरेवस्ती ता जुन्नर जि. पुणे) हे बस ची वाट पहात असताना.

एक पांढरे रंगाची विना नंबरची मारूती अल्टो कार तिचा वरती काळा रंगाचा टफ असलेली गाडी त्यांच्याजवळ येवून थांबली व त्यातील इसम हे त्यांस म्हणाले की, कुठे जायचे आहे. त्यावेळी राहुल श्रीवास्तव हे त्यांना मला पुणे येथे जायचे आहे असे सांगीतले असता, त्यांनी आम्हीपण पुणे येथे निघालो आहे.

तुम्हांला यायचे असेल तर २०० रू दयावे लागतील असे सांगून राहुल श्रीवास्तव यांना गाडीत बसवले व गाडी पुणे- नाशिक हायवे रोडने टोल नाक्याचे पुढे गेल्यानंतर राहुल श्रीवास्तव यांचे जवळ बसलेल्या दोघांजणांनी त्यांस शिवीगाळ दमदाटी करण्यास सुरूवात केली त्यामुळे राहुल श्रीवास्तव हे त्यांना मला सोडा असे म्हणाले असता.

त्यांनी त्यांचे जवळील लोखंडी रॉडने राहुल श्रीवास्तव यांचे उजवे बाजूचे गालावर डोक्यात, हातावर, पाठीवर मारहाण करून सदर गाडीतील अज्ञात तीन इसमांनी राहुल श्रीवास्तव यांचे उजवे हातातील एक चांदीची अंगठी, हातामधील स्मार्ट वॉच, मोटो कंपणीची मोबाईल तसेच आय.डी.बी.आय.

महाराष्ट्र बॅक, एच.डी.एफ.सी. इलाहाबाद बँकेचे ऐ.टी.एम. ड्रायविंग लायसन्स, पॅन कार्ड, रोख रक्कम असा १६,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेवून राहुल श्रीवास्तव यांस लोखंडी रॉडने व हाताने मारहाण करून जखमी करून त्यांना रोडमध्येच सोडून देवून पळून गेले आहेत. म्हणून आळेफाटा पोलीस स्टेशन गु.र.नं ४०/२०२४ भा.द.वि. कलम ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे गांर्भाय लक्षात घेता, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतिश होडगर यांनी पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी व स्टाफची पथके बनवून त्यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने सुचना केल्या होत्या. त्यानुसार गुन्ह्याचे तपासी अधिकारी सपोनि सुनिल बडगुजर व पोलीस पथक हे सदर गुन्हयातील आरोपींचा व गुन्हयातील वापरलेल्या वाहनाचा शोध घेत असताना.

नमुद गुन्हे शोध पथकाला गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक बिना नंबर प्लेटची पांढऱ्या रंगाची मारूती अॅल्टो कार ही (आणे ता. जुन्नर जि. पुणे) येथिल फॉरेस्टमध्ये बंद स्थितीत असून सदर वाहनाजवळ ०३ इसम हे संशयीत रित्या दिसून येत आहे, असे मिळाले बातमीचे अनुषंघाने सदरचे पोलीस पथक हे तात्काळ सदर ठिकाणी गेले असता.

त्यांना नमुद गुन्हयाचे अनुषंघाने सदरचे वाहन हे मिळते जुळते मिळून आल्याने पोलीस पथकाने नमुद वाहन व त्यामधिल ०३ इसमांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारला असता, त्यांनी त्यांचे नाव व पत्ता १) शुभम भागाजी बुगे वय २९ वर्षे रा. बुगेवाडी ता. पारनेर जि. अहमदनगर, २) सुशांत भास्कर राजदेव वय १९ वर्षे रा. काळेवाडी, सावरगाव ता. पारनेर जि. अहमदनगर व ३) संकेत बाळासाहेब बोरूडे वय १८ वर्षे ढोकेश्वर ता. पारनेर जि. अहमदनगर, असे असल्याचे सांगितले.

तसेच त्यांच्याकडे गुन्हयाचे अनुषंघाने तपास करता, त्यांनी नमुद गुन्हा केला असल्याची कबुली दिली. त्यामुळे सदर गुन्हयातील आरोपी नामे १) शुभम भागाजी बुगे वय २९ वर्षे रा. बुगेवाडी ता. पारनेर जि. अहमदनगर, २) सुशांत भास्कर राजदेव वय १९ वर्षे रा. काळेवाडी, सावरगाव ता. पारनेर जि. अहमदनगर व ३) संकेत बाळासाहेब बोरूडे वय १८ वर्षे रा. टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर जि. अहमदनगर यांना गुन्हयाचे तपासकामी अटक करून.

त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवून नमुद आरोपींकडून गुन्हयात वापरलेली अॅल्टोकार सह गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल असा एकुण १,१६,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर गुन्हयातील आरोपी नामे शुभम भागाजी बुगे वय २९ वर्षे रा. बुगेवाडी ता. पारनेर जि.अहमदनगर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरी, चोरी असे गंभीर स्वरूपाचे खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी हि पंकज देशमुख (पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण), रमेश चोपडे (अप्पर पोलीस अधिक्षक पुणे विभाग), रविंद्र चौधर (उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. बी. होडगर यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, सहा. फौजदार चंद्रा डुंबरे, पो. हवा. विनोद गायकवाड, पो.ना पंकज पारखे, पो.कॉ. अमित मालुंजे, पो.कॉ नविन अरगडे, पो.कॉ. हनुमंत ढोबळे यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे