भरदिवसा खोडद येथे महिलेचा खून करणारे ४८ तासांत जेरबंद; CCTV च्या आधारे पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा
1 min read
नारायणगाव दि.१४:- जुन्नर तालुक्यातील खोडद येथे दि. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी (धनवट मळा) येथील जेष्ठ महिला सुलोचना कोंडीभाऊ टेमगिरे (वय ७०) या एकट्या घरी असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यावर धारदार हत्यारांनी वार करून त्यांचा खून केला होता.
या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. ग्रामीण भागात भर दिवसा खून झाल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले होते.पोलिसांनी अवघ्या ४८ तासात परिसरातील रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच गोपनीय बातमीदाराच्या माहितीनुसार या खूनातील आरोपी शोधण्यास पोलिसांना यश आले आहे.
या घटनेतील आरोपी हे बंटी और बबली नवरा बायको असून आरोपी शिवम उर्फ संकेत श्याम श्रीमंत (वय २१ वर्ष) व पूनम संकेत श्रीमंत (वय २० वर्ष) दोघेही मूळ राहणार गजानन नगर, चिखली ता. चिखली, जिल्हा बुलढाणा यांनी
मयत सुलोचना टेमगिरे यांच्या राहत्या घरातून त्यांचा मोबाईल व सोन्याचे दागिने चोरी केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून चोरी केलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला असून सोन्याच्या दागिनाबाबत त्यांच्याकडे चौकशी चालू आहे. दोन्ही आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर करण्यात आले
असून तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान दोन्ही आरोपी नवरा बायको असून आठ दिवसापूर्वीच खोडद येथील धनवट मळा परिसरात ते शेतात मजुरीसाठी आले होते.
ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार,
सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस उपनिरीक्षक सनिल धनवे, विनोद धुर्वे, जगदेव आप्पा पाटील, अभिजीत सावंत, पोलीस अंमलदार दीपक साबळे, राजू मोमीन, अतुल डेरे, प्रकाश वाघमारे, विक्रम तापकीर, मंगेश थिगळे,अक्षय नवले, संदीप वारे,
शैलेश वाघमारे, तुषार भोईटे, संतोष कोकणे, अमोल शेडगे, धीरज जाधव, सत्यम केळकर, निलेश शिंदे, अक्षय सुपे, दगडू विरकर, सचिन सातपुते, आदिनाथ लोखंडे, गोविंद केंद्रे, मंगेश लोखंडे, दत्ता ढेंबरे, महिला अंमलदार तनश्री घोडे यांनी यशस्वी तपास केला.