राजुरीत २ साखळी सिमेंट बंधाऱ्यांचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते जलपूजन व उद्घाटन; ६० लाख रुपये खर्च
1 min read
राजुरी दि.२९:- राजुरी (ता.जुन्नर) मधील गुरवशेत ओढ्यावर ६० लक्ष रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेल्या २ साखळी सिमेंट बंधाऱ्यांचे उद्घाटन आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते संपन्न झाले.
दोन्ही बंधारे पिंपळगाव जोगा कालव्याच्या सुयोग्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने भरण्यात आले. राजुरी ग्रामस्थ आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या पाण्याचे जलपूजन करण्यात आले.
यामुळे राजुरी, आळे, बोरी परीसरातील शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. या बंधाऱ्यामुळे राजुरी आणि परिसरातील पाणलोट क्षेत्रात वाढ होणार आहे आणि याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
यावेळी समवेत ग्रामनेते दिपक औटी, सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, सरपंच बोरी वनिता डेरे, माजी सरपंच एकनाथ शिंदे, माजी सरपंच एम.डी.घंगाळे, जयसिंग औटी, राजेंद्र कुऱ्हाडे, राजीव औटी, शिवाजी हाडवळे, रंगनाथ औटी, गौरव घंगाळे, सखाराम गाडेकर यांसह महिला व स्थानिक शेतकरी उपस्थित होते.