दिलीप वळसे पाटील कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराची सांगता; विद्यार्थांनी बांधली स्मशानभूमीची संरक्षक भिंत
1 min read
रानमळा दि.२८:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रानमळा (ता. जुन्नर) चे राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक निवासी श्रमसंस्कार सात दिवसांचे शिबिर संपन्न झाले. या शिबिर कालावधीत गावच्या स्मशानभूमीतील बऱ्याच दिवसापासून पडलेले संरक्षक कठडे साधारणपणे आठ फूट लांब आणि दहा ते बारा फूट उंच भिंत मुलांनी श्रमदानातून पूर्ण केली आहे.शिबिर कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी ग्राम स्वच्छता, मंदिर परिसर स्वच्छता, ग्रामपंचायत आणि स्मशानभूमी परिसर स्वच्छता करून आम्हा ग्रामस्थांसमोर आदर्श निर्माण केला.
तसेच आमच्या गावच्या स्मशानभूमीतील बऱ्याच दिवसापासून पडलेले संरक्षक कठडे, असे चिरस्थायी, टिकाऊ, मौलिक कार्य केल्याचे ग्रामपंचायत सदस्य संतोष गुंजाळ यांनी व्यक्त केले. रानमळा गावच्या लोकनियुक्त सरपंच सविता तिकोणे यांनी पुढील पाच वर्ष अशा स्वरूपाचे शिबिर रानमळा गावात राबविण्याबाबतची अपेक्षा प्राचार्य व संस्थेचे अध्यक्ष यांजकडे व्यक्त केली.
तसेच शिबिर काळात विद्यार्थ्यांनी केलेली ग्राम स्वच्छता, लोकसंख्या सर्वेक्षण, स्मशानभूमी काम याचे कौतुक केले.शिबिराच्या समारोपप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजिनियर पंढरीनाथ गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले आणि आम्ही सुद्धा याच माध्यमातून घडवून समाजाची सेवा करत आहोत.
तुमचेही भविष्य उज्वल आहे राष्ट्रीय सेवा योजना आपणास मेहनत, कष्ट करण्यास शिकविते, समाजामध्ये वागण्यास शिकविते आणि जगण्यासही शिकवते. या ठिकाणी बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी फड आणि त्यांची टीम उपस्थित राहून स्वयंसेवक आणि ग्रामस्थांचे हिमोग्लोबिन, ब्लड प्रेशर व आरोग्य तपासणी करून या शिबिराची शोभा वाढविली.
त्यामुळे हे श्रमसंस्कार शिबिर यशस्वी झाल्याचे त्यांनी नमूद केले. संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार आणि प्राचार्य डॉ.छाया जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुढील वर्षी आपल्याच गावात शिबिराचे आयोजन करून स्वयंसेवक अधिक चांगले काम करतील अशी ग्वाही दिली.
या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.छाया जाधव, इंजिनीयर पंढरीनाथ गुंजाळ, सरपंच सविता तिकोणे, ग्रामपंचायत सदस्य संतोष गुंजाळ, चार्टर्ड अकाउंटंट बाबासाहेब बांगर, माजी सरपंच सुरेश तिकोणे, बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी फड.
तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीन मोजाड यांनी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,आणि सर्व ग्रामस्थांचे गेल्या.
आठ दिवसांमध्ये दिलेल्या स्नेहाबद्दल आणि केलेल्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती गायकवाड आणि प्रा रवींद्र सरोदे यांनी आभार मानले. अशी माहिती प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. अनिल पडवळ यांनी दिली.