मराठा आरक्षण विजयोत्सव- १२० तोफांची सलामी,फटाक्यांची आतिषबाजी, पेढे वाटून आनंद साजरा
1 min read
संगमनेर दि.२८:- मराठा संघर्षयोद्धा शिवश्री मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाच्या सर्व मागण्या शासनाने मान्य करून अध्यादेश जारी केला. मराठा आरक्षणाचा आनंदोत्सव सकल मराठा समाज बांधव हिंदू धर्म संस्कृतीतील दिपावली सणाप्रमाणेच आजचा दिवस साजरा केला.साकुर पठारभागातील साकुर चौफुली येथे विजयोत्सव साजरा करताना सकल मराठा समाजाच्या वतीने १२० तोफांच्या सलामी सोबत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तसेच बिरेवाडी येथील सकल मराठा समाजाच्यावतीने १२० तोफांची सलामी, फटाक्यांची आतिषबाजी, पेढे वाटून आनंद साजरा करत असताना.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय…,एक मराठा…लाख मराठा, सकल मराठा समाज एकजुटीचा विजय असो, मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटलांच्या विजय असो या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.याप्रसंगी एकमेकांना पेढे देत आनंद व्यक्त करताना विष्णू ढेंबरे, बाजीराव ढेंबरे, पोपट सागर, रामभाऊ सागर, गोरख सागर.
अनिल सागर, नानासाहेब ढेंबरे, नवनाथ ढेंबरे, दत्तात्रय ढेंबरे, बबन सागर, बाबाजी सागर, तुषार ढेंबरे, किसन सागर, दादाभाऊ ढेंबरे, योगेश ढेंबरे, राजेंद्र ढेंबरे, कृष्णा ढेंबरे, ओंकार ढेंबरे, शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे यांची उपस्थिती होती.