प्रजासत्ताक दिनानिमित्त गुंजाळवाडी शाळेला ग्रामस्थांनी वस्तूरुपाने दिली तब्बल २ लक्ष रुपयांची अनमोल भेट 

1 min read

बेल्हे दि.२७:- आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधत कै.बबन लक्ष्मण गुंजाळ यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुुपुत्र गुंजाळवाडी गावचे भूषण शांताराम बबन गुंजाळ यांनी डिटिजल शाळा संकल्पनेला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी, गावच्या शाळेतील विदयार्थ्यांना सहजरीत्या नवनवीन तंत्रज्ञान शिकता येण्यासाठी, डिजीटल शिक्षणाची अनुनाभूती

अगदी सहजरीत्या घेता यावी, काळाची पावले ओळखून ज्ञानमंदिराला अमूल्य भेट म्हणून १ लक्ष ३२ हजार रु.किमतीचा Interactive Board (डिजीटल बोर्ड) जि.प.शाळा गुंजाळवाडी (बेल्हे ता.जुन्नर) शाळेस सप्रेम भेट दिला. तसेच १५००० रू. किमतीचे शैक्षणिक साहित्य कीट विद्यार्थ्यांना शांताराम गुंजाळ व सुनिल लक्ष्मण बोरचटे यांनी भेट दिले. त्यासोबत शाळेसाठी १५००० रु किमतीचे काचेचे कपाट कै.हौसाबाई व मारूती पुताजी बोरचटे यांच्या स्मरणार्थ सदाशिव (बबू) व बाबाजी मारूती बोरचटे या बंधूंनी दिले.

तसेच शाळेस ९००० रुपयांचे Podem शाळा समिती उपाध्यक्ष मारुती उमाजी बोरचटे मेजर व नवनाथ यमन बोरचटे यांनी भेट दिले. कै.नामदेव गोपाळा बोरचटे यांचे स्मरणार्थ अशोक नामदेव बोरचटे HPGas यांसकडून २११११ रु.व कै.लक्ष्मीबाई मारुती गुंजाळ यांचे स्मरणार्थ बबनराव मारुती गुंजाळ यांचेकडून ५००१ रु, डॉ. सुशांत नढे यांसकडून २००० रु ची शालेय ठेव पावती म्हणून प्राप्त झाले.

तसेच शैक्षणिक मदतनिधी व खाऊसाठी ६००० रुपयांची ग्रामस्थांनी अनमोल अशी भेट दिली. राजाराम बाबुराव बोरचटे यांसकडून विद्यार्थ्यांना बस्करपट्टया उपलब्ध झाल्या. जुन्नर तालुका मित्र मंडळाकडून शालेय ग्रंथालयास पुस्तके उपलब्ध झाली. महेश वाघ व ग्रामपंचायतच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप झाले. ज्ञानेश्वर गुंजाळ यांनी इलेक्ट्रीक फिटिंग सौजन्य दिले.

या कार्यक्रमाचे नियोजन तुकाराम खोडदे व पाटीलबुवा खामकर यांनी केले. अध्यक्ष सतिश बोरचटे, उपाध्यक्ष मारूती बोरचटे यांनी उत्तम व्यवस्था केली. या प्रसंगी सरपंच नयना गुंजाळ, उपसरपंच राहूल बोरचटे, प्रमुख अतिथी शांताराम गुंजाळ, मेजर संदिप यादव इ.मान्यवरांच्या शुभहस्ते डिजीटल बोर्डचे उद्घाटन झाले. देणगीदात्यांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात येऊन त्यांना शालेय व्यासपीठावर सन्मानित केले गेले.

या प्रसंगी बबन गुंजाळ, किसन बोरचटे, गोविंद बोरचटे, जालिंदर गुंजाळ, अशोक नरवडे, बाबाजी गुंजाळ, संदेश औटी, धोंडीराम बोरचटे, नाना वाघ, रामदास गुंजाळ, लक्ष्मण बोरचटे, गोरक्षनाथ गुंजाळ, संतोष गुंजाळ, दिपाली बोरचटे, सुनिता गुंजाळ, पाराजी बोरचटे, श्यामराव गुंजाळ, सिद्धेश बोरचटे, योगेश गुंजाळ, ग्रामसेविका वर्षा लोंढे, सर्व ग्रा.पं.सदस्य व कर्मचारी वृंद, अंगणवाडीताई, शिक्षणप्रेमी, शालेय समिती सर्व सदस्य, पालकवर्ग, तरुणवर्ग व समस्त ग्रामस्थ मोठया संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे