मंचर ला सगेसोयरे आरक्षणामुळे मराठा समाजाने साजरा केला आनंदोत्सव

1 min read

मंचर दि.२७:- मनोज पाटील जरांगेंच्या मुंबई वर लाखो मराठा बंधुभगीनींसह मारलेल्या धडकेने हबकलेल्या महाराष्ट्र सरकारने कुणबी नोंदी असतील त्यांच्या रक्तसंबंधातील सगेसोयरेंना प्रतिज्ञापत्रानंतर प्रत्यक्ष भेट देऊन कुणबी दाखले देण्याचा आदेश काढुन आरक्षण वगुन्हे मागे घेण्याचे आदेश काढला. मराठा समाजाच्या एकजुटीने मराठा आरक्षण विरोधी व सरकार अक्षरशः गुडघ्यावर आले, जरांगे पाटील आझाद मैदानावर उपोषणावर ठाम असल्याने सरकारच्या तोंडचे पाणी पळाले, तर मराठा आरक्षणावर तोंड बंद ठेवणारे आमदार खासदारांत निवडणुक आली की मिरवायची, भुमीपुजन, उद्घाटनाची साथ सुटते, पण गावबंदी. गावोगावी जाब विचारला जात असल्याने घरातच बसावे लागले, सरकारमध्ये असुन तोंड न ऊचकणारे आता मात्र या आनंदोत्सवात बगलबच्चांसह सामील होत आहेत.
या आरक्षण अन् कुणबी दाखले देण्याचा आदेशाचं श्रेय केवळ लोकशाही मार्गाने प्रचंड आंदोलन करुन सरकार ला घाम फोडणारे मनोज जरांगे पाटील व आंदोलनात सहभागी, हातभार लावणाऱ्या मराठा समाजाचे एकजुटीचे आहे. यामुळे मंचर शहरासह आंबेगाव तालुक्यातील गावागावात फटाके, डि.जे.वाजवुन नाचत या आनंदोत्सवात सहभागी झाले आहेत. मंचर च्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेकडोंच्या संख्येने जमा झालेल्या मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, मनोज जरांगे पाटलांचा विजय असो, एक मराठा लाख मराठा या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. मागण्या मान्य झाल्याने सरकारने सुटकेचा निःश्वास सोडला, आता मुंबई पुण्यात राहून पार्ट टाइम समाजसेवेचा बुरखा पांघरून पाच वर्षांत कधीमधी येणारे आणि कार्यकर्त्यांना एकमेकात झुंजायला लावून मतदाराची फसवणूक करणारे, आतुन मिळालेले पण एकमेकांचे कट्टर विरोधक भासवणारे. कित्येक वर्षे जनतेच्या विकासाच्या नावाखाली सगळं आपल्याच निवडक हस्तकांकडे दाबुन ठेवुन मतदारांची कोंडी करून, साम दाम दंड भेद वापरून स्वतःला मतदान करुन घेणारे मालक समजणारे, बोलके पुढारी त्यांच्या संपुर्ण वंशजांसह, पिढ्यानपिढ्या विकासाची आश्वासने देत आता गावोगावी रोज दिसु लागतील. अशी चर्चा सर्वत्र होत आहे. आता नाही तर कधीच नाही, या भावनेतून सामान्य माणूस मनोज पाटील जरांगेंपासुन प्रेरणा घेऊन यावेळी परिवर्तन घडवून सामान्य माणसांचीच निवड करण्यासाठी निवडणूकीची आतुरतेने वाट पाहत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे