चिंचोली मोराची गावात विक्रमी ६९५ बैलगाड्यांचा सहभाग

1 min read

चिंचोली मोराची दि.२७:-शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील मोरांसाठी प्रसिद्ध चिंचोली मोराची गावात ६९५ बैलगाडे सहभागी झाले असुन प्रथमच विक्रमी संख्येने बैलगाडा शर्यत संपन्न होत आहे. गुरुवार २५ पासून यात्रेस सुरूवात झाली असून त रविवार २७ ला फायनल स्पर्धा होणार आहे. यात्रेस प्रा.सुरेखा निघोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी तालुका प्रमुख आंबेगाव आणि प्रा.अनिल निघोट मा तालुका प्रमुख भारतीय विद्यार्थी सेना आंबेगाव तसेच ईतर मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या.पहिल्या दिवशी घाटाचा राजा मनोहर घावटे सह सुनिल पठारे राळेगण ११.३१ सेकंद तर दुसरे दिवशी कु.प्रक्रुती प्रमोद वाघमारे देवदैठण तालुका पारनेर ११.१६ सेकंदासह ठरला. तर हॉटेल समाधान चे कै. मच्छिंद्रशेठ बबनराव बोर्हाडे, जऊळके तालुका खेड ११.६१ सेकंद विशेष आकर्षण ठरला.बैलगाडा यात्रेत अध्यक्ष सर्जेराव नाणेकर, उपाध्यक्ष सुर्याजी नाणेकर सरपंच विमल नाणेकर, उपसरपंच चैत्राली गोरडे,पार्थ नाणेकर, सचिन नाणेकर, दशरथ नाणेकर यांनी ऊत्तम नियोजन तर सेकंद कामकाज संतोष नाणेकर व साहेबराव नाणेकर तर निशान ऊत्तम नाणेकर यांनी पाहिले.तर अनाऊंसर संतोष ढोकले, माउली मुळे, पप्पु शिंगाडे, बाळासाहेब शेळके यांनी बैलगाडा रसिकांना आपल्या धावत्या समालोचनाने मंत्रमुग्ध केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे