हजरत ख्वाजा गरीब नवाज मोफत जन आरोग्य शिबीर संपन्न; आरोग्य सेवा हीच खरी मानव सेवा:- शरद सोनवणे

1 min read

आळेफाटा दि.२७:- उम्मत कि खिदमत फाऊंडेशन, साद सोशल फाऊंडेशन (पिंपरी चिंचवड) व डॉ पंजाबराव कथे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानमंदिर हायस्कूल च्या पटांगणात सालाबादप्रमाणे सुफी संत हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या वार्षिक उत्सवानिमित्त “हजरत ख्वाजा गरीब नवाज मोफत जन आरोग्य शिबीर” आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर या तालुक्याचे तसेच नगर जिल्ह‌यातील पारनेर व संगमनेर तालुक्याचे सुमारे ३८०० नागरिकांनी सहभाग नोंद‌विला. आरोग्य शिबीराचे उद्घाटन ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ, आळे ता. जुन्नर या शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त तथा माजी पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे यांच्या हस्ते व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.उद्‌घाटन प्रंसगी उम्मत कि खिदमत फाऊंडेशनचे मुख्यप्रर्वतक हाजी गुलाम नबी शेख यांनी प्रास्ताविक करताना सांगितले कि सालाबादप्रमाणे आयोजित या मोफत जन आरोग्य शिबिरामध्ये हिंदु व मुस्लिम दोन्ही समाजाचे नागरीक यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असून हे शिबीर राष्ट्रीय एकतेचे प्रतिक असल्याचे सांगितले. भारत देशामध्ये गेल्या शेकडोवर्षात अनेक सुफी संत व संत महात्मा यांनी दिलेली शिकवण याचे आचरण करून त्यांचा संदेश या आरोग्य शिबीराच्या माध्यमातून सर्व धर्मीय नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले आणि या शिबिराच्या माध्यमातून जनसामान्य नागरीकांना याचा लाभ होत असल्याने समाधान व्यक्त केले.समर्थ शैक्षणिक संकुलचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी संकल्प आणि उम्मत की खिदमत च्या माध्यमातून सतत राबविण्यात येणाऱ्या अनेक सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून यामुळे समाजातील दुर्लक्षित घटकास याचा लाभ होत असल्याचे सांगून संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.साद सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना उपनेते इरफान भाई सय्यद यांनी शिबिराला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजेच हे यशस्वी आयोजन असल्याचे सांगून रुग्णांचे योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करिता पूर्ण सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.GST मुंबई विभागाचे उपायुक्त नासीर मनेर (IRS) यांनी या शिबिराचे उत्तम आयोजन हे वैद्यकीय क्षेत्रातले रोल मॉडेल असल्याचे सांगून असे शिबिर राज्यभर आयोजित करणे आवश्यक असून या मुळे शासनाच्या योजना हे तळागाळात पोहोचविणे सहज शक्य होईल तसेच तिन्ही आयोजक संस्थेच्या कार्यास सलाम असल्याचे सांगून या पुढील काळात उपक्रमासाठी पुरेपूर सहकार्य करणार असल्याचे सांगितले.डॉ. कथे डॉयग्नोस्टीक सेंटरचे मुख्य डॉ. पंजाबराव कथे यांनी मनोगत व्यक्त करताना सालाबादप्रमाणे होणाऱ्या या आरोग्य शिबीराला दरवर्षी नागरीकांचा प्रतिसाद वाढत असल्याचे सांगून या शिबीराचा जुन्नर व इतर लगतच्या तालुक्यातील गरीब व गरजू नागरीकांना याचा लाभ होत असल्याचे सांगितले. शिबिराचे उद्घाटक जीवन शिंदे यांनी या आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा होणाऱ्या सुफी संत हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या वार्षिक उत्सवाचे कौतुक करून असे आरोग्य शिबीर नियमित पणे आयोजित केल्यास त्याचा गरीब व गरजू नागरिकांना नक्कीच लाभ होईल असे सांगितले. शिबिरादरम्यान जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी उपस्थित राहून आरोग्य शिबीराच्या उत्तम नियोजनाबद्‌दल समाधान व्यक्त करून उपस्थित नागरिकांना संबोधित करताना संगितले कि सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होत असताना. नागरिकांना अनेक आजार व त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने जन आरोग्य शिबीर हे नियमितपणे आयोजित करणे आवश्यक असल्याचे सांगुन शिबीरामध्ये अनेक आजारांचे नामवंत व तज्ञ डॉक्टर एकाच ठिकाणी उपस्थित असल्याने नागरिकांना याचा सर्वाधिक लाभ होतो विशेष करून गरीब व गरजू नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी व उपचाराची संधी उपलब्ध होते असे सांगितले.सदर शिबीराचे वैशिष्ट्य म्हणजे विविध आजारांचे तज्ञ डॉक्टर्स यांच्याकडून मोफत तपासणी व निदान करण्यात आले तसेच शिबीरात सहभागी रुग्णांना मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले. सदर शिबीरात जुन्नर, आंबेगाव, तसेच पुणे व नगर जिल्यातील नामवंत डॉक्टर्स यांनी उपस्थित राहुन रुग्णांची तपासणी व निदान केले. तसेच पुणे व नगर जिल्हयातील विविध हॉस्पिटल्स यांनीही त्याच्या पथकासमवेत शिबीरामध्ये सहभाग नोंदविला. डॉ. कथे डायगनोस्टिक सेंटरकडून सिटीस्कॅन, सोनोग्राफी, एक्सरे, मेमोग्राफी इत्यादी टेस्ट हे ५० % सवलतीच्या दराने व एम.आर.आय वर रुपये २००० ची सवलत देण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र आळे व राजुरी, जुन्नर तालुका मेडिकल प्राक्टीशनर्स असो.,ग्रामोन्नती मंडळ संचलित ज्ञानमंदिर हाय स्कूल, डॉ.डोळे फाउंडेशन, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट , जयगणेश रुग्णसेवा अभियान, सर्व मेडिकल दुकानदार, मेडिकल असोसिएशनचे सुरेश वराडी यांचे विशेष सहकार्य लाभले.शिबिरात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, डॉ.रफिक मोकाशी, डॉ.मनोज काचळे, डॉ.कुमेल सय्यद, डॉ.पिंकी कथे, डॉ.संदीप डोळे, हाजी शफी मोमीन, हाजी सईद पटेल, रऊफ इनामदार, जाफर पठाण, रफिक मोमीन, युसुफ अतार, शाकिर चौगुले, सादिक अतार, मोबिन शेख, साजीद खान,राजू जमादार, जुबेर शेख, इरफान काझी, अ.कदिर मोमीन. सिद्दिक इनामदार, इम्रान मणियार, जुबेर अतार, जब्बार भाई इनामदार, फारुक पटेल, मुजम्मिल पठाण, मुस्तफा शेख, आयाज बेग, मोहसीन जमादार, जाहिद शेख, जिलानी पटेल, आरिफ पटेल, मोहसीन इनामदार, वसीम पटेल, शाहिद पटेल, सुफियान मोमीन व इतर मान्यवर उपस्थित होते.उम्मत की खिदमत चे सचिव प्रा.मेहबूब काझी यांनी शिबिरामध्ये सूत्रसंचालन केले व समारोप प्रसंगी शिबिरात सहभागी व विशेष सहकार्य लाभलेले सर्वांचे आभार प्रदर्शन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे