बेल्हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला १ लक्ष ३२ हजार रुपयाची डिजिटल स्क्रीन भेट

1 min read

बेल्हे दि.२६:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं -१ शाळेत 75 व्या प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे ध्वजारोहण डॉ.कल्पना घोलप यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या शुभ दिनाचे औचित्य साधत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी निलेश घोलप यांनी ही डिजिटल स्क्रीन शाळेला भेट दिली. निलेश घोलप, सरपंच मनिषा डावखर, जानकु डावखर यांच्या शुभहस्ते या डिजिटल स्क्रीनचे उद्घाटन पार पडले.

नोकरी व्यवसाया निमित्त परदेशात असतानाही शाळेबद्दल प्रेम आत्मीयता तसेच संगणक युगात मराठी शाळेतील मुलांनाही संगणक शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने शाळेला सहकार्य केलेबद्दल

शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुप्रिया बांगर उपाध्यक्ष सोहेल बेपारी, दादाभाऊ मुलमुले, शितल गुंजाळ, वैशाली मटाले, संतोष पाबळे, अनिल पिंगट सर्व सदस्य तसेच मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी देणगीदारांचे आभार मानले.

 या प्रसंगी ग्रामपंचायत उपसरपंच राजु पिंगट , सदस्य, कमल घोडे, मंदाकिनी घोडे, किरण गुंजाळ, योगिता बांगर, नाजीम बेपारी सर्व पालक, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे