वळसे पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा             

1 min read

निमगाव सावा दि.२५:- पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगाव सावा (ता.जुन्नर) येथे 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला.

राज्यशास्त्र विभाग, विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा मतदार दिन साजरा करण्यात आला. प्रा.सुभाष घोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. राष्ट्रीय मतदानाची शपथ दिली.

प्राचार्या डॉ. छाया जाधव यांनी मतदार दिनाचे महत्त्व विशद केले आणि सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना आपले नाव मतदार यादी मध्ये नोंदवून यापुढे भविष्यात प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आपल्या बहुमोल मताचे राष्ट्रासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संदीपान पवार, सचिव परेश घोडे, संचालक भाऊ थोरात, संस्था प्रतिनिधी कविता पवार, प्राचार्य डॉ. छाया जाधव, प्रा. प्रल्हाद शिंदे, प्रा. अनिल पडवळ, प्रा. प्रवीण गोरडे, श्री.गोविंद गाडगे, प्रा. नीलम गायकवाड, प्रा.नंदा आहेर, प्रा.पूजा चिंचवडे,

प्रा. माधुरी भोर, प्रा. आकाश धुमाळ, प्रा. शिवाजी साळवे, क्रीडाशिक्षक विजय काळे, प्रा.अश्विनी काळे, प्रा. संगीता पवार श्री शांताराम गाडगे, व विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे