आळेफाटा पोलिस स्थानकाच्या निरीक्षकपदी सतीश होडगर यांची नियुक्ती
1 min readआळेफाटा दि.२:- आळेफाटा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांची सातारा येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी सतीश होडगर यांनी कार्यभार स्वीकारला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी तात्पुरता सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्याकडे प्रभारी म्हणून पदभार दिला होता. आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असणारे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांची आळेफाटा पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून नेमणूक झाली. या पदाचा पदभार त्यांनी गुरुवार (दि. १) सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्याकडून स्वीकारला. या वेळी पोलिस उपनिरीक्षक रागिनी कराळे, अनिल पवार यांनी पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांचे स्वागत करून सत्कार केला.