स्वरताज गीत गायन स्पर्धेत श्रीनिका शेळके दुसरी

1 min read

बेल्हे दि.२८:- इनरव्हील क्लब ऑफ मंचर आयोजित (स्वरताज) जुन्नर, आंबेगाव, खेड तालुका आंतरशालेय गीत गायन स्पर्धा नुकतीच पार पडली.समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल या सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील श्रीनिका वल्लभ शेळके या विद्यार्थिनीने या स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळविल्याची माहिती प्राचार्य सतिश कुऱ्हे यांनी दिली.समर्थ गुरुकुलमध्ये सध्या संगीत शिक्षक म्हणून कार्यरत असणारे व स्वरमंगेश संगीत विद्यालय आळे येथील संगीत शिक्षक राहुल दुधवडे यांच्याकडे श्रीनिका गायनाचे धडे घेत आहे. श्रीनिका वल्लभ शेळके हिने मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके.विश्वस्त वल्लभ शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, क्रीडा संचालक एच पी नरसुडे तसेच सर्व महाविद्यालयातील प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्रीनिकाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे