ऑनलाइन सर्वेतून तयार केला जलस्रोत बळकटीकरणाचा आराखडा
1 min readराजुरी दि.२८:- सावित्रीबाई पुणे विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना व समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स.
समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ लॉ कॉलेज बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवकांचा ध्यास ग्राम व शहर विकास लोकसंख्या नियंत्रण जनजागृती पर विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन नुकतेच राजुरी येथे १६ जानेवारी ते २२ जानेवारी २०२४ या कालावधीत पार पडले.
या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी राजुरी गावचा सर्वे करत आधार कार्ड, मतदार नोंदणी, आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, आरोग्य विषयक समस्या, ई-पिक नोंदणी, सेंद्रिय शेती, परसबाग, शेततळे, बोअरवेल, विहिरी, नाले, ओढे, पशुविमा इत्यादी बाबतची माहिती संकलित करून ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याकडे सुपूर्त केली.
पोलीस निरीक्षक अशोक पिंपळे महामार्ग सुरक्षा पथक मदत केंद्र आळेफाटा यांच्यामार्फत रस्ता सुरक्षा अभियान २०२४ या विषयावर एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.स्वच्छ भारत अभियान आणि प्लास्टिक मुक्त भारत या संकल्पनेला मूर्तिमंत रूप देण्यासाठी शिबिरातील विद्यार्थ्यांनी आज वन विभाग जुन्नर व ग्रामपंचायत उंचखडक यांच्या सहकार्याने उंचखडक (खबडी) येथे जाऊन प्लास्टिक मुक्त खबडी करण्याचा निश्चय करून सर्व परिसर स्वच्छ केला.विद्यार्थ्यांनी मंगरूळ येथील स्वप्नवेध या अनाथ बालकांच्या आश्रमाला भेट देत एक मूठ धान्याची हा अभिनव उपक्रम राबवत तेथील अनाथ बालकांना दिडशे किलो धान्य वाटप केले.ऐतिहासिक स्थळ दत्तक योजनेतर्गत विद्यार्थ्यांनी नारायणगडचा इतिहास जाणून घेतला व परिसर स्वच्छता केली.व्याख्यानमालेच्या माध्यमातून स्थानिक इतिहास लेखन व सरदार कंठाजी कदम पांडे यांचा इतिहास या विषयावर डॉ.विलास गोरडे यांनी विस्तृत माहिती दिली.विज्ञान आणि अध्यात्म या विषयावर रतिलाल बाबेल यांनी तसेच युवकांपुढील आव्हाने या विषयावर जी के औटी सरांनी केलेले विवेचन विद्यार्थ्यांना खूप भावले. डॉ.जयसिंग गाडेकर यांचा गझलांचा कार्यक्रम, जुन्नर जैवविविधता आणि पक्षी वैभव या विषयावर यश मस्करे यांचे व्याख्यान,छोटे पाटबंधारे विभागाचे उप अभियंता रावसाहेब मुके यांनी जलसंधारणाच्या विविध पद्धती व जलस्रोत संवर्धन आणि बळकटीकरण याविषयी मार्गदर्शन केले.ह भ प गणेश महाराज वाघमारे यांचे आई मायेचा सागर या विषयावर प्रवचन विद्यार्थ्यांना अंतर्मुख करणारे ठरले. कवी संदीप वाघोले यांच्या विनोदी कवितांनी विद्यार्थ्यांनी मनमुराद हास्याचा आनंद दिला.या शिबिरामध्ये स्त्री भ्रूण हत्या, रस्ता सुरक्षा अभियान, जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, महिला सक्षमीकरण, वनराई बंधारा. अंधश्रद्धानिर्मूलन पर जनजागृती कार्यक्रम, योगासने, स्त्री-पुरुष समानता,व्यसनमुक्त भारत,माझी वसुंधरा अभियान,पोस्टर सादरीकरण,स्वच्छता अभियान, वृक्षारोपण,स्थानिक इतिहास लेखन,शालेय स्पर्धा अशा अनेकविध उपक्रमांचा समावेश करण्यात आल्याचे वल्लभ शेळके यांनी सांगितले.यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती दिपक औटी, संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके तसेच राजुरी गावच्या सरपंच प्रिया हाडवळे,अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांतचे अध्यक्ष बाळासाहेब औटी,मुंबई पोर्ट ट्रस्ट चे निवृत्त अधिकारी बबनराव हाडवळे, ज्ञानदीप पतसंस्थेचे अध्यक्ष गोरक्ष हाडवळे. विशाल ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष पाटील औटी,महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दिलीप शेठ घंगाळे,माजी अध्यक्ष संदीप औटी, ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ पाटील औटी,सखाराम गाडेकर, शाकीरभाई चौगुले, गणेश हाडवळे, महेंद्र हाडवळे, पांडू दादा कोरडे, सुरेश शेठ औटी, उंचखडक गावचे माजी उपसरपंच दत्तू नाना कणसे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे मेडिएटर अशोक भोर,समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार, डॉ.लक्ष्मण घोलप, समर्थ इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर आदी मान्यवर आणि राष्ट्रीय सेवा योजनेतील शिबिरार्थी विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,रासेयो समन्वयक प्रा.दिनेश जाधव,प्रा.भूषण दिघे,प्रा.सचिन भालेकर,प्रा.गौरी भोर,प्रा.अश्विनी खटिंग, प्रा.साबळे, प्रा.भागवत तसेच ३०० विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.