सह्याद्री व्हॅलीत प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

1 min read

राजुरी दि.२८:- राजुरी (ता. जुन्नर) येथील महारिया चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूल आणि सह्याद्री व्हॅली इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संस्थेचे संचालक गणपत कोरडे, संचालक सचिन चव्हाण, संचालिका नलिनी कोरडे,

सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूलच्या संचालिका वर्षा दत्तात्रय भालेराव, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य पी.बलराम पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल रिझवाण शेख, कॉलेज व विद्यालयाचा सर्व शिक्षक स्टाफ तसेच इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी, सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.

सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आकाशात डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याला ड्रिल परेड द्वारे मानवंदना देऊन विद्यार्थ्यांनी लेझीम, देशभक्तीपर गीते व डान्स सादर केले. सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देखील विविध योगा प्रात्यक्षिके सादर केली.

संचालक गणपत कोरडे यांनी आपल्या मनोगतात प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन भविष्यामध्ये इंजीनियरिंग कॉलेज आणि पब्लिक स्कूलची भरभराट मोठ्या प्रमाणात होणार आहे अशी अशा व्यक्त केली. पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल रिजवाण शेख यांनी विद्यालयात सुरू झालेले विविध क्रीडा प्रकार कबड्डी खो-खो, हॉलीबॉल क्रिकेट.

कराटे, जुडो, किक बॉक्सिंग, कुस्ती, आर्चरी, टेबल टेनिस, अथलेटिक्स, बॅडमिंटन पोस्टर कॉम्पिटिशन, सायन्स एक्झिबिशन, क्रीडा सप्ताह, सहल, स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांकरीता उपलब्ध ग्रंथालय, ई लर्निंग, संगणक लॅबची माहिती दिली.

तसेच विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांकरता भविष्यात देणाऱ्या सर्व उत्कृष्ट भौतिक आणि शैक्षणिक सुविधांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती यांनी केले.
तर आभार प्रदर्शन इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य पी.बलराम यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे