धाबेवाडी जिल्हा परिषद शाळेत कविता तिटकारे यांच्या हस्ते ध्वजारोहण

1 min read

धाबेवाडी दि.२६:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धाबेवाडी (ता.खेड) येथे सर्व विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

झेंडावंदन कविता बाळासाहेब तिटकारे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब तिटकारे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पांडूरंग तिटकारे, नामदेव तिटकारे, शंकर तिटकारे, सुनिता जोशी व ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याध्यापक प्रविण पारवे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे