पोक्सोच्या गुन्ह्यातील आरोपी आळेफाटा पोलिसांच्या हातून निसटला
1 min readआळेफाटा दि.२८ :- पोक्सो कायद्याअंतर्गत पोलीस कोठडीत असणाऱ्या आरोपीला आळेफाटा (ता.जुन्नर) पोलीस ठाण्याचे कर्मचारी जुन्नर सबजेल मध्ये ठेवण्यासाठी घेऊन जात असताना जुन्नर शहरातील परदेशपुरा जवळ आरोपीने वाहनाचा दरवाजा तोडून अंधाराचा फायदा घेत हातकडीसह पळ काढण्याचा प्रकार २६ जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास घडला.आळेफाटा पोलिसांनी आरोपीचा पाठलाग केल्यानंतरही आरोपी सापडला नाही. अजय तान्हाजी मुठे (वय २२, रा कोतुळ ता. अकोले जि. अहमदनगर) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. आळेफाटा पोलीस स्टेशनचे अंमलदार भुजंग सुकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २६ जानेवारी रोजी अंमलदार भुजंग सुकाळे व होमगार्ड कबीर सय्यद आळेफाटा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गून्ह्या मधील पोलीस कोठडीमध्ये असणारा. आरोपी अजय तान्हाजी मुठे याला पोलीस वाहनाने जुन्नर सबजेलमध्ये जमा करण्यासाठी नेत असताना जुन्नर शहरातील परदेशपुरा येथे नऊ वाजेच्या सुमारास आरोपीने वाहनाचा उजव्या बाजूचा दरवाजा उघडून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. आळेफाटा पोलिसांनी पाठलाग करून देखील आरोपी सापडला नाही. त्यानंतर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांच्या या हलगर्जीपणाचा नागरिकांनी खेद व्यक्त केला आहे.