मटका अड्ड्यावर आळेफाटा पोलिसांचा छापा
1 min read
आळेफाटा दि.२०:- बुधवार दि. १७ आळेफाटा चौकापासून जवळच राजरोसपणे सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई करीत एका जणावर गुन्हा दाखल करत अवघे ३६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जितेंद्र गणपत औटी (रा.आळे, ता. जुन्नर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आळेफाटा (ता.जुन्नर) येथील एका इमारतीमागे बाम्हनेमळा रोडवर मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला.
पिंपळवंडी गाव परिसरात एका कांदा चाळीच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांनी आळेफाटा छापा टाकत केलेल्या कारवाईत करून ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.