वंचित बहुजन आघाडी च्या वतीने मंचर पोलिस स्टेशन वर आक्रोश मोर्चा!
1 min readमंचर दि.१८:- आंबेगाव तालक्यातील, लांडेवाडी च्या शिवाजी लवांडे यांची कन्या अश्विनी बाळू केसकर यांची लांडेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी बाळंतपणावेळी डॉक्टर आणि नर्स यांच्या हलगर्जी पणातून गैरहजर असल्यामुळे तडफडून मृत्यु पावली. सदर वैद्यकीय कर्मचारींवर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करावी व वळती गावातील संदीप मिर्के यांच्या मुलाची हत्या करण्यात आले परंतु, मुलीचं प्रेमप्रकरणा ची खोटी केस दाखून कोणतीही कारवाई होत नाही, मुलगा अत्यवस्थ अवस्थेत असताना त्याचा जबाब व खोटी सही वैद्यकीय अधिकारींनी घेतली असा आरोप – मिर्के कुटुंबियांचा असून ह्याचा तपास सीबीआय कडे सोपवण्यात यावी. अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडी ने मंचर पोलिस स्टेशन दखल घेत नसल्याने आक्रोश मोर्चा काढला. ज्यात वंचित बहुजन आघाडी आंबेगाव तालुकाध्यक्ष शिवाजी राजगुरु, जुन्नर तालुकाध्यक्ष गणेश वाव्हळ, उपाध्यक्ष पंकज सरोदे, संभाजी राजगुरु,सागर जगताप, आतिश ऊघाडे, वंचित ट्रान्सपोर्ट युनियन चे प्रदिप साळवे. महासचिव मधुकर चाबुकस्वार, महिला अध्यक्ष दिपाली साबळे, अनिल गायकवाड, शशिकांत भालेराव, निलेश देठे, देवा देठे, फकिरा देठे, धनेश राजगुरु, रोहिदास शिशुपाल, विक्रांत आल्हाट, जुन्नर महिला अध्यक्ष वैशाली खुडे, सुरैया शेख आणि भारतीय विद्यार्थी सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मा. तालुकाप्रमुख प्रा.अनिल निघोट यांसह जुन्नर, आंबेगाव तालुक्यातुन बहुसंख्येने वंचित चे कार्यकर्ते हजर होते. संपर्क प्रमुख व मिरके या मुलाची आई संगिता मिरके, आश्विनी केसकर चे वडील शिवाजी लवांडे, आई वंदना लवांडे यात न्याय मागण्यासाठी सहभागी झाले होते. यावेळी मंचर पोलिस स्टेशनवर मोर्चा आला असता त्यांचे म्हणणे समजून घेऊन, नायब तहसीलदार,सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर यांनी निवेदन स्वीकारून संयमाने परिस्थिती हाताळुन भावना समजून घेऊन. नातेवाईकांबरोबर पोलीस पाठवुन जिल्हा वैद्यकीय अधिकारींचा अहवाल लवकर मागवून घेऊ व संबंधित कर्मचारींवर योग्य ती कारवाई करू व दोन्हींच्या नातेवाईकांनी आपले म्हणणे लेखी स्वरूपात द्यावे, योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची हमी दिल्याने मोर्चेकरींनी समाधान व्यक्त केले. या मोर्चासाठी मंचर पोलिस स्टेशन येथे पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.