आळेफाटा एसटी स्टँडवर चोरी करणारी टोळी जेरबंद; ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

1 min read

आळेफाटा दि.१७:- आळेफाटा पोलिसांनी बस स्थानकावर चोरी करणारी टोळीस जेरबंद करून ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत आळेफाटा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.२७ डिंसेंबर रोजी विजय मंजाभाऊ औटी हे आळेफाटा या ठिकाणाहुन मुंबई या ठिकाणी जाण्यासाठी. अहमदनगर – कल्याण एस.टी.मध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरून नेल्यानंतर या बाबतची फिर्याद पोलीस स्टेशनमध्ये दिल्यानंतर पोलीसांनी तपास सुरू केल्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हे चोर चाकी गाडी घेऊन चोरी करत असल्याचे निर्देशनास आल्यानंतर पोलिसांचे पथक बिड येथील पाडळशिंगी या ठिकाणी जाऊन. १) रामेश्वर अंबादास जाधव रा.शिरापुर या.शिरूर कासार, २) विकास शिवाजी गायकवाड रा.दहिटना बु.ता.घनसांगवी जि.जालना, ३)आकाश अशोक जाधव रा.सलगरा बु.लातुर, ४) दिपक ज्ञानेश्वर जाधव रा.शिरापुर धुमाळ ता.शिरूर कासार ५) सागर संपतराव झेंडे रा.अंबिका चौक बाब,६) जालिंदर वामन डोकडे रा.शिरूर कासार ,७) अरिफ रेहमान शेख रा.मोमिन पुरा बिड या सात जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता. त्यांची सखोल चौकशी केली असता आरोपींनी आळेफाटा पोलीस हद्दीत ४ गुन्ह्यामध्ये साडे सात तोळे सोन्याचे दागिने चोरल्याचे कबुल केले व चोरलेले सोने आकाश बेंद्रे रा.बीड यास विकल्याचे सांगीतल्यानंतर पोलिसांनी गुन्हा करतेवेळी वापरण्यात आलेली बोलेरो वाहन एम.एच.४४ बी.७१३७ असा ऐकुन ८ लाख ६० हजार रुपयांचा माल जप्त करून आरोपींस अटक करण्यात आली आहे.सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे ,उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिलेल्या सुचनेवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर ,सहा.फौजदार चंद्रा डुंबरे, विनोद गायकवाड.नरेंद्र गायकवाड,भिमा लोंढे,संजय शिंगाडे, दुपारगुडे, पारखे,अमित माळुंजे ,नविन अरगडे,हनुमंत ढोबळे, केशव कोरडे पोलीस मित्र सचिन पानसरे,रामराजे मुळीक यांनी केली.दरम्यान आळेफाटा पोलिसांनी आतापर्यंत एस.टी‌.स्टॅड वर प्रवाशांचे दागिने चोरणा-या वेगवेगळ्या टोळींकडुन १८ गुन्हे उघडकीस आणले असुन त्यांच्याकडुन जवळपास ५३ तोळे सोने व १५ तोळे चांदीचे दागीने जप्त केले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे