ओतूर येथील डॉक्टरकडे बनावट पदवी; पोलिसांत गुन्हा दाखल

ओतूर दि.१४: ओतूर (ता. जुन्नर) येथील समर्थ हॉस्पिटलचे डॉ. समीर कुटे यांच्यावर खोट्या डिग्रीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बी.ए.एम.एस.ची
डिग्री असताना एम.बी.बी.एस. ची डिग्री प्रिस्क्रीप्शनवर लिहून ते नागरिकांची फसवणूक करीत होते, असे चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणी सरकारतर्फे ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी फिर्याद दिली होती. लोकांची दिशाभूल केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यानेत्यांच्या विरोधात लेखी आदेश जुन्नर तालुका गटविकास अधिकारी यांनी काढले. दरम्यान, कुटे यांनी समर्थनार्थ कोणत्याही प्रकारचे सबळ कागदपत्रे सादर केली नाहीत. पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल केरूरकर पुढील तपास करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे