कत्तलीसाठी जाणाऱ्या १२० जनावरांची सुटका; बेल्हे गावात पोलिसांचा छापा; बेल्ह्यातील तिघांना अटक
1 min readबेल्हे दि.११:- बेल्हे (ता. जुन्नर ) येथे छापा टाकून कत्तल करण्याच्या उद्देशाने चारा पाण्याची व्यवस्था न करता, अवैधरित्या निर्दयतेने दोरखंडाने बांधून ठेवलेली ११६ वासरे व ४ गायी अशी एकूण १२० जनावरे आळेफाटा पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे.अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.या प्रकरणी अल्ताब हमीद बेपारी (वय वर्ष 48 रा.मुक्ताबाई चौक, बेल्हे, तालुका- जुन्नर) 2) हसिफ शरीफ बेपारी (वय 36 रा. पेठ आळी बेल्हे, तालुका- जुन्नर), कल्पेश रौफ कुरेशी वय 19 रा. पेठ आळी,बेल्हे ) यांना अटक करण्यात आली असून पुढील तपासासाठी त्यांना आळेफाटा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देणे आले आहे. जनावरांची रवानगी गो शाळेत करण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या सूचनेनुसार जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शना खाली स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत. फौजदार प्रकाश वाघमारे, तुषार पंधारे, पोलीस हवालदार दिपक साबळे, विक्रम तापकीर, जनार्धन शेळके, योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे, संदीप वारे, अक्षय नवले, दगडू वीरकर यांच्या पथकाने केली.