पोलिसांनी सिनेस्टाईल कारवाई करून सव्वा लाखांच्या एमडी ड्रग्ज सह तीन आरोपी केले जेरबंद

1 min read

लोणावळा दि.४:- लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. मावळ परिसरातील ड्रग्सचा वाढता विळखा रोखण्यासाठी व तरुणाईला नशेच्या आहारी जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी तसेच परिसर ड्रग्समुक्त करण्यासाठी कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ति अभियान हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सत्यासाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अमलीपदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत कठोर कारवाया हाती घेतल्या आहेत. सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की, कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे ताजे व नायगाव परिसरात काही इसम हे मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर एम.डी या अमलीपदार्थाची अतिशय छुप्या पद्धतिने विक्री करत असून त्यामुळे परिसरातील तरुणाई ड्रग्स च्या विळख्यात अडकत चालली आहे. बातमीचे गांभीर्य ओळखून सहा.पोलीस अधीक्षक सत्यासाई कार्तीक यांनी अत्यंत कमी वेळेमध्ये सदर आरोपिंचे येण्या जाण्याचे मार्ग, त्यांची कार्यपद्धती इ.ची इत्यंभूत माहिती मिळवून त्यांचे पथकासह दिनांक 30/12/2023 चे रात्रीपासूनच मौजे ताजे परिसरात सापळा रचला होता. दिनांक 31/12/2023 रोजी सकाळी 02.25 वाजताच्या सुमारास आरोपी नामे खंडू कुटे हा त्याचे बाईकवरून ताजे गावाकडून पिंपलोळी गावाकडे येत आहे. अशी खात्री होताच पथकाने त्यास चहू बाजूंनी घेरले, परंतु पोलिसांची चाहूल लागताच आरोपी खंडू कुटे हा कारवाईच्या भीतीने त्याची बाईक भरधाव वेगात पळवत तेथून पसार होण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु पोलीस पथकाने जीवाची पर्वा न करता आरोपी खंडू कुटे यास सिनेस्टाईल पद्धतीने ताब्यात घेतले. तसेच पंचांसमक्ष त्याची झाडाझडती घेतली असता त्याचे ताब्यातून 30 ग्रॅम वजनाचा 90,000/- किमतीचा विक्रीसाठी आणलेला एमडी हा अमलीपदार्थ व त्याची पॅकिंग व विक्री करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पॅकींग च्या प्लास्टिकच्या पिशव्या असा एकूण सुमारे 1,30,000 रू/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच त्यानंतर दिनांक 31/12/2023 रोजी रात्री 20.55 वा सत्यसाई कार्तीक यांनी पथकासह नायगाव परिसरात सापळा रचला असता आरोपी नामे 1) रोशन चंद्रकांत ओव्हाळ, वय 24 वर्ष, रा.नायगाव तालुका मावळ जिल्हा पुणे, 2) अमीत भरत भानुसघरे, वय 24 वर्ष, रा देवराम कॉलनी कामशेत, हे दुचाकीवरून एम डी हा अमलीपदार्थ विक्री करण्यासाठी आलेले असताना. पथकाने त्या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले व पंचांसमक्ष त्यांचे अंगझडतीत दोघांकडे प्रत्येकी 5 ग्रॅम असा एकूण 30,000 रू किमतीचा 10 ग्रॅम एम डी अमली पदार्थ मिळून आला आहे. वर नमूद दोन्ही कारवायांमध्ये 1,20,000 रू किंमतीचा 40 ग्रॅम वजनाचा एम डी ड्रग व एकूण 2,00,000 रू किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.सदरबाबत पो कॉ रहिस मुलानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एन.डी.पी.एस ॲक्ट 1985 चे विविध कलमान्वये कामशेत पोलीस स्टेशन येथे दोन स्वतंत्र गुन्हे नोंद कण्यात आले असून पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक. सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पोसई भारत भोसले, पोहवा सचिन गायकवाड, पोहवा नितेश (बंटी) कवडे, पोहवा अंकुश नायकुडे, पोकॉ रहीस मुलानी, पोकॉ सुभाष शिंदे, पोकॉ अमोल ननवरे, पोकॉ अंकुश पवार, पो कॉ आशिष झगडे, होमगार्ड सागर दळवी यांचे पथकाने केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे