आण्यात मोबाईल शॉपी फोडुन चोरट्यांनी एक लाख रुपयांचे मोबाईल चोरले

1 min read

आणे दि.२९:- आणे या ठिकाणी चोरटयांनी मोबाईल शॉपी फोडुन एक लाख रुपयांचे मोबाईल नेले चोरून नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार आणे (ता.जुन्नर) या ठिकाणी योगेश गांडाळ यांची आर्यन‌ मोबाईल शॉपी या नावाने दुकान असुन त्यांनी दि.२७ रोजी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून गेल्यानंतर दुस-या  दिवशी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मित्र राजेंद्र पांडे

याने फोन करून सांगितले की दुकानाचा मागील बाजुचा पत्रा उचकलेला दिसत आहे त्यानंतर घटनास्थळी आल्यानंतर दुकान उघडल्यानंतर दुकानातील १ लाख रूपयांचे ७ मोबाईल चोरीला गेल्याचे निर्दर्शनास आल्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांनी दिली.

घटनास्थळी पोलिसांनी येऊन पंचनामा केला असुन पुढील तपास आळेफाटा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास गोसावी करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे