दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात संदीप थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण

1 min read

निमगाव सावा दि.२६:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयात संदीप थोरात (संचालक श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान) यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

प्राचार्य डॉ. छाया जाधव यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन या दिनाचे महत्व, इतिहास आणि आपले कर्तव्य याविषयीं मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देवांश संदीपान पवार यांजकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, संस्थेचे माजी सचिव गणपत घोडे, अध्यक्ष संदीपान पवार, संचालक भाऊ थोरात, सरपंच किशोर घोडे, चंद्रकांत जावळे गुरुजी, अब्दुल पटेल, प्राचार्य डॉ. छाया जाधव, योगेश गाडगे, निवृत्ती पवार,माजी विद्यार्थी, गावातील ग्रामस्थ, तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे