प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
1 min read
बांगरवाडी दि.२६:- प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांगरवाडी (ता.खेड) येथे सर्व विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
अश्विनी राजगुरू, ज्योती भेगडे, डॉ. उत्कर्षा कुचेकर, डॉ.सुकृत कुचेकर यांच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना शालेपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मोनिका नाटे यांनी सहकार्य केले.यावेळी सरपंच आंबेकर, बांगरवाडी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दुंदा लांघी, सदस्य रामदास बांगर, सर्व पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.