जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे शाळेमध्ये पाढे पाठांतर स्पर्धेचे आयोजन

1 min read

बेल्हे दि.२५:- स्वातंत्र्यवीर युवा फाउंडेशन बेल्हे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर -१ शाळेत पाढे पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी करण्यात आले. फाउंडेशनचे सदस्य विलास पिंगट यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पाढे हे विद्यार्थ्यांचे मित्र आहेत. यामुळे गणिती क्रिया जलद करता येतात, तसेच बुद्धीचा विकास होतो त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी पाढे पाठ केलेच पाहिजे असे आवाहन मुलांना केले.शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेत पाढे पाठांतर स्पर्धेमध्ये यश मिळवले. इयत्ता पहिली मध्ये प्रथम क्रमांक अद्वैत विलास पिंगट, द्वितीय क्रमांक स्वराली राहुल कोकणे तृतीय क्रमांक ऋत्वी निवृत्ती बांगर हीचा आला. इयत्ता दुसरी मध्ये प्रथम क्रमांक स्वराली तुषार कोकाटे, द्वितीय क्रमांक तरन्नुम तय्यब पठाण, तृतीय क्रमांक मेहरीन समीर इनामदार हीचा आला.इयत्ता तिसरी मध्ये
प्रथम क्रमांक स्वरा धोंडीबा औटी, द्वितीय क्रमांक
समीक्षा सुनील थोरात,तृतीय क्रमांक ईशिता सागर घोडे, इयत्ता चौथी मध्ये प्रथम क्रमांक आराध्य सचिन भालेराव.द्वितीय क्रमांक श्लोक अनिल गुंजाळ, तृतीय क्रमांक रुद्र शशिकांत कोकणे इत्यादी विद्यार्थ्यांनी यामध्ये यश संपादन केले.इयत्ता चौथी चा विद्यार्थी आराध्य सचिन भालेराव याने 45 पर्यंत व पहिलीचा विद्यार्थी अद्वैत विलास पिंगट याने 20 पर्यंत पाढे म्हणत उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. स्वातंत्र्यवीर युवा फाउंडेशन यांच्या वतीने किशोर अभंग यांजकडून विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सुप्रिया बांगर, उपाध्यक्ष सोयल बेपारी, सदस्य विलास पिंगट, दादाभाऊ मुलमुले, शेखर पिंगट, विजू घोडके, प्रीतम मुंजाळ, स्वप्नील मुंजाळ, सचिन बनकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या मुलांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका बेलकर यांनी स्वातंत्र्यवीर युवा फाउंडेशन चे आभार मानले. शाळेतील सर्व शिक्षकांनी या स्पर्धेचे नियोजन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे