गुंजाळवाडी जिल्हा परिषद शाळेत आनंदी बाजारातून बालचमूंनी प्रत्यक्ष अनुभवले दैनंदिन गणित
1 min readबेल्हे दि.२५:- गुंजाळवाडी (बेल्हे) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात शाळेच्या वतीने विदयार्थ्यांच्या गणितीय प्रतिभेला वाव देण्यासाठी, जीवनातील गणिताची प्रत्यक्ष अनुनाभूती मिळण्यासाठी बाल आनंदी बाजाराचे सुंदरसे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थी पालक व त्याहीपुढे जाऊन ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहावयास मिळाला. यामध्ये भाजीपाल्यासोबतच खाऊगल्ली विशेष लक्षवेधी ठरली. यावेळी विदयार्थ्यांना आलेले अनुभव त्यातून मिळालेला आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून आला. या बाजारातून विद्यार्थ्यांची १० ते १२ हजार रुपयांची उलाढाल झाली. परिसरातील ग्राहकांनीही या बाजारातील वस्तू खरेदी करून उपक्रमाविषयी समाधान व्यक्त केले. या बाजाराचे यशस्वी आयोजन शिक्षकवृंद तुकाराम खोडदे व पाटीलबुवा खामकर यांनी केले. याप्रसंगी सरपंच नयना गुंजाळ यांनी शुभेच्छा देऊन बालचमूंचे कौतुक केले. याप्रसंगी शाळा समिती अध्यक्ष सतिश बोरचटे, उपाध्यक्ष मारूती बोरचटे. उपसरपंच राहूल बोरचटे, तसेच सर्व ग्रा.पं सदस्य,सिमा बोरचटे, मेजर संदिप यादव, बारकू बोरचटे, गुलाब बोरचटे, शांताराम गुंजाळ, बबन गुंजाळ, सिद्धेश बोरचटे, आशिष पवार, कार्तिक बोरचटे, दत्ता यादव, एकनाथ गुंजाळ उपस्थित होते.