सह्याद्री व्हॅली इंजिनीरिंग कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर उत्साहात संपन्न

1 min read

राजुरी दि.२४:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड टेक्नॉलॉजी, राजुरी येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे सप्ताह श्रम संस्कार शिबीर युवकांचा ध्यास ग्राम- शहर विकास या शीर्षकाखाली उंब्रज नं.१ या गावात व श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन गावचे सरपंच हिरामण शिंगोटे यांच्या हस्ते झाले.

ग्राम विकास ट्रस्ट उंब्रज नं.१ चे अध्यक्ष व संभाजी ब्रिगेड चे उपाध्यक्ष रमेश हांडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. श्रीकांत फुलसुंदर लाभले. यावेळी ‘विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजना’ या विषयावर बोलताना प्रा. श्रीकांत फुलसुंदर म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी महत्त्वपूर्ण असे शिबिर आहे.

यामधून श्रमसंस्कार केले जातात तसेच या उपक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण व्हावी तसेच सामाजिक कार्याचा सराव व्हावा यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हा शासनाचा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. आजचा नवयुवक अशा शिबिरातून घडतो त्यामुळे युवकांनी मोठ्या प्रमाणामध्ये शिबिरामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे असे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

तत्पूर्वी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे इन्चार्ज प्राचार्य पी. बलराम यांनी केले. या शिबिरामध्ये पन्नास (५०) विद्यार्थ्यांनी उत्सपुर्थपने सहभाग नोंदवला. या शिबिरा दरम्यान विविध उपक्रम राबवण्यात आले ते असे, शिबिरामध्ये दिवसाची सुरुवात योगासनाणे होत असे. मतदान जनजागृती करणे.

लोकसंख्या नियंत्रण आणि जनजागृती, ई पिक पाहणी विषयी जनजागृती करणे, ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती, व्यक्तिमत्व विकास, अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती करणे, त्याकरिता विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादरीकरण केले. घरोघरी जाऊन जनजागृती केली. आरोग्यविषयी माहिती दिली.

प्राथमिक शाळा उंब्रज नं.१, श्री महालक्ष्मी हायस्कूल या ठीकाणी भेटी देऊन विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले व व्यसनमुक्ती या विषयावर पथनाट्य सादर करून उपस्थितांचे मने जिकली आणि समाज प्रबोधनाचे कार्य केले. त्याच बरोबर विद्यार्थ्यांनसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून पारितोषिक वितरण केले. या शिबिरामध्ये विविध विषयावर व्याख्याने झाली.

“व्यक्तिमत्व विकास आणि व्यवस्थापन” या विषयावर प्रा. गणेश आभाळे यांनी अप्रतीम भाषण दिले. राजे शिव छत्रपती आणि आजचा युवक या विषयावर शिवश्री प्रवीण सोनवणे यांनी विचार मांडले.लोकसंख्या नियंत्रण आणि आरोग्य या विषयावर डॉ. प्रताप रोह्कले यांनी मार्गदर्शन केले.

या शिबिरादरम्यान अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. समारोप प्रसंगी द. भा. दांगट गुरुजी, ग्राम विकास ट्रस्टचे अध्यक्ष उंब्रज नं.१ चे रमेश हांडे, राहुल शंकर हांडे, निवृत्त पी.एस.आय. दामोदर हांडे, मनोहर हांडे, डॉ. प्रताप रोहकले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे संचालक सचिन चव्हाण, इन्चार्ज प्राचार्य पी. बलराम आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. उद्धव भारती आणि निकिता पावडे यांनी केले तर आभार वेदिका शिंदे यांनी मानले. राष्ट्रीय सेवा योजना शिबीर समारोप प्रसंगी गावातील नागरिक महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे